पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची माहिती आली समोर | PM Kisan Yojana 20th Installment new Updates

By Chaughule Mahesh

Published on:

PM Kisan Yojana 20th Installment new Updates: केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजना सुरू करत असतात. शेतकऱ्यांना मान सन्मानाने जगता यावे, शेतकरी आत्मनिर्भर बनावे यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांमध्ये अगदी कमी काळातच ही योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.पीएम किसान योजना ही 2019 पासून सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजने दरम्यान देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा केले जातात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Kisan Yojana 20th Installment पीएम किसान सन्मान निधी योजनेचे वर्षाला 3 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. म्हणजेच 2000 रुपये एका हप्त्यात असे 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात.

PM Kisan Yojana 20th Installment शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 20 वा हप्ता जमा होणार आहेत.

PM Kisan Yojana 20th Installment Date पीएम शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 19 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे 20 व्या हप्त्याची. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा लागली आहे. आतापर्यंत या योजनेत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

PM Kisan Yojana केंद्र सरकार दर चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करते. प्रत्येकी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. 19 वा हफ्ता फेब्रुवारी 2025 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता.

PM Kisan Yojana यापूर्वी 18 वा हप्ता आक्टोंबर 2024 मध्ये जमा करण्यात आला होता. हे लक्षात घेता 20 वा हप्ता जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. परंतु अजून अशी कोणतीही अधिकृत घोषणा केंद्र सरकारने या विषयी केलेली नाही.

पीएम किसानच्या २० व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल

अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे पीएम किसान निधीचा हप्ता मिळण्यास अडचण येते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँक किंवा सायबर कॅफेवाल्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत, त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना इकडे तिकडे भटकावे लागणार नाही. ज्यामध्ये तुम्ही नोडल अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर देखील तक्रार करू शकता. या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. कारण त्यांना आता नोडल ऑफिसरच्या मदतीने त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय मिळतील.

नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….

अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment