प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana 2025

By Chaughule Mahesh

Published on:

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हि भारत सरकारद्वारे सामान्य जनतेसाठी, गौर गरीब आणि आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या लोकांसाठी सुरु करण्यात आलेली योजना होय. दिनांक 9 मे 2015 मध्ये भारत सरकारद्वारे (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana in marathi) हि योजना सुरु करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे काय ?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत लाभार्थ्याला दोन लाख रुपये लाईफ इन्शुरन्स विमा दिला जातो. या योजनेमध्ये सहभागी व्हयाचे असेल तर अर्जदाराला ठराविक वार्षिक रक्कम ( प्रिमियम ) भरावा लागतो.

सदर विमा पॉलीसी साठी अर्जदाराला वार्षिक प्रिमियम फक्त आणि फक्त ४३६ रु भरावे लागते. सदर रक्कम हि दरवर्षी अर्जदाराला भरावी लागते. जर लाभार्थ्याच्या बँक खात्यात प्रिमियम करता लागणारी रक्कम असेल तर, वार्षिक प्रिमियम रक्कम हि लाभार्थ्याच्या खात्यातून ऑटो डेबिट करण्यात येते. ऑटो डेबिट मुळे लाभार्थ्याला दर वर्षी योजनेसाठी प्रिमियम भरण्याचे टेन्शन नसते. योजनेअंतर्गत दिला जाणारा विमा हा पॉलीसीधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा वारसांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते. या योजनेचा लाभ १८ ते ५५ वयगटातील व्यक्ती घेऊ शकतात. योजनेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदारांना आर्थिक मदत म्हणून दोन लाख रुपये मिळतात.

PMJJBY योजनेच्या पात्रता

  • १. योजनेअंतर्गत सहभागी असलेल्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणे आवश्यक.
  • २. अर्जदाराचे वय १८ पूर्ण झालेले असावे.
  • ३. अर्जदारचे कमीत कमी वय हे ५५ पेक्षा कमी असावे.
  • ४. बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून योजनेसाठी लागणारा प्रिमियम ऑटोकट करण्याची अर्जदाराची संमती असावी. या मुळे योजनेसाठी लागणार प्रिमियम बँक खात्यातून कपात केला जातो.

*अपात्रता*

  • १. अर्जदाराचे वय हे ५५ पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण होणार असेल.
  • २. अर्जदाराचे बँक किंवा पोस्ट ऑफिस मधील खाते बंद झाले असेल.
  • ३. बँक खात्यात पुरेसी रक्कम नसेल.
  • ४. एका पेक्षा अधिक बँक खात्यातून प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी अर्ज केला असेल.
  • ५. प्रिमियम पेमेंटच्या तारखेला खात्यात पुरेसी रक्कम नसेल.
  • ६. प्रिमियम न भरल्यामुळे योजनेतून बाहेर पडल्यास.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे

  • Jeevan Jyoti Bima Yojana या योजनेसाठी तुम्हाला फक्त 436 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. हे पैसे तुमच्या खात्यातून तुमच्या परवानगी नंतर ऑटो डेबिट पद्धतीने कापले जातात. त्यावर तुम्हाला दोन लाख रुपयांचा  विमा मिळतो.
  • या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही या योजनेत कधीही सामील होऊ शकता किंवा या योजनेतून बाहेरही पडू शकता. ही एक समूह योजना आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते.
  • ज्या वर्षात तुम्ही 436 रुपये भरले तेवढे एका वर्षासाठी तुमची योजना सुरू राहते. जर तुम्ही ही रक्कम कोणत्याच वर्षात भरू शकला नाही तर विम्याची सुविधा संपुष्टात येईल. तरीही नंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जेव्हा तुम्ही या योजनेत सहभागी होणार आहात त्यावेळी पुन्हा या योजनेत तुम्ही सहभागी होऊ शकतात.
  • त्या बदल्यात तुम्हाला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. इतकी सोपी आहे ही योजना.
  • Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2025 प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
  • जी की तर तुम्हाला जीवन विमा पोलीस मध्ये करावी लागते मात्र जर तुम्हाला काही आजार असेल तर तुम्ही ही पोलिसी घेऊ शकत नाही विमा पॉलिसीच्या संमती पत्रा या  आजारांचा उल्लेख आहे तुम्हाला त्या आजाराने ग्रासलेले नसल्याचा जाहीरनामा द्यावा लागतो या योजनेअंतर्गत तुम्हाला कलम 80 सी च्या अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे वैशिष्ट्ये

  • 1) Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती वैद्यकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
  • 2) योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 18 वर्षे ते 50 वर्षाच्या दरम्यान वयो मर्यादा असावी.
  • 3) या पोलीस ची मॅच्युरिटी 55 वर्षापर्यंत आहे.
  • 4) या योजनेतून प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागते.
  • 5) या योजनेद्वारे तुम्हाला दोन लाख रुपये पर्यंतची विम्याची रक्कम मिळते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी फक्त 436 रुपये प्रति वर्ष हप्ता आहे. ही रक्कम तुमच्या खात्यातून दर वर्षाला डेबिट केले जाते.या योजनेच्या रकमेवर बँक
  • 6) या योजनेच्या रकमेवर बँक प्रशासनिक शुल्क आकारते. त्याचबरोबर जीएसटी ही लागू होते.
  • 7) विमा कवरच्या कालावधीत जर या विमाधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये यांची रक्कम प्राप्त होते. जर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या PMJJVY माध्यमातून विमा कवर घेणाऱ्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त बँकांमध्ये प्रीमियम भरला असेल तरीही त्याच्या मृत्यू नंतर त्याला दोन लाख याहून अधिक रक्कम मिळत नाही.
  • 8) या योजनेचा लाभ घेण्यासाठी चा कालावधी हा एक वर्ष किंवा त्याहून अधिक आहे. जर एखाद्या व्यक्तीने दीर्घ मदतीचा पर्याय निवडला असेल, तर दरवर्षी चा प्रीमियम बँक त्याच्या खात्यातून परस्पर कट करते. ज्या दिवशी तुमच्या खात्यातून रक्कम कट होते त्या दिवसापासूनच तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची PMJJVY सुविधा मिळते.
  • 9) तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा पॉलिसी वर्षातील कोणत्याही तारखेला सुरू करा तरी तुम्हाला पहिल्या वर्षासाठी त्याचे कव्हरेज 31 मे पर्यंत वैध राहते. प्रत्येक वर्षी 01 जून रोजी बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम भरून या विम्याचे नूतनीकरण केले जाते.
  • 10) धानमंत्री जीवन ज्योती विमा योजना साठी फॉर्म वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे जसे की इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, बांगला, कन्नड, ओडिया, तेलुगु आणि तामिळ आदी भाषा आहेत.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • १. आधार कार्ड.
  • २. बँक पासबुक ( बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे )
  • ३. मतदान कार्ड किंवा पॅण कार्ड
  • ४. आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
  • ५. पासपोर्ट फोटो

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
  • जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर, तुमच्याकडे मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही या योजेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • जर तुमच्या कडे इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने योजेसाठी अर्ज करू शकतात.ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जावे लागेल.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना साठी तुम्हला एक ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल.
  • ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ऑफलाईन अर्जासोबत जोडा व तुमच्या जवळच्या बँक शाखेत जमा करून तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मध्ये सहभागी होऊ शकतात.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment