Rashan Card New Updates 2025: राशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, आपल्याला जून महिन्यापर्यंत पुढील तीनही महिन्यांची धान्य वाटप होणार आहे, शासनाने हा निर्णय का घेतला आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि सर्व गावातील नागरिकांसाठी हे आर्टिकल शेअर नक्की करा.
नागरिकांना पुढील तीन महिन्याची धन्य एक सोबतच मिळणार
आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट, २०२५ पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना ३० जून, २०२५ पर्यंत रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेस सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरुन सुलभ वितरणाच्या एष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.तरी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट, २०२५ पर्यंतच्या अजधान्याची उचल रास्तभाव दुकानांमधून त्वरीत करावी.
कोणत्या महिन्याच्या धान्य मिळणार
रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अगदीच कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील रेशन कार्डधारकांना जून महिन्यात पुढील तीन महिन्यांचे रेशन दिले जाणार आहेत. म्हणजेच पुढील जून महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अन्नधान्य सुरक्षेचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केंद्रातील सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनामध्ये ऑगस्टपर्यंतचे धान्य 30 जूनपर्यंत वितरित करण्यासाठी राज्य सरकारला सुसंगत पावले उचलण्यास सांगितले गेले आहे आणि या अनुषंगाने संबंधितांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
लाभार्थ्यांसाठी आवाहन आणि महत्व
हा निर्णय विशेषतः दुर्गम भागात (Remote Areas) आणि पूरप्रवण क्षेत्रात (Flood-Prone Areas) राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. पावसाळ्यात वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्यास किंवा दुकाने बंद राहिल्यास अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठी ही आगाऊ व्यवस्था करण्यात आली आहे.
शासनाने सर्व पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी ३० जून २०२५ पूर्वी आपले तीन महिन्यांचे एकत्रित धान्य (PDS Grains) आपल्या रास्त भाव दुकानातून घेऊन जावे. यामुळे त्यांना पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होणार नाही आणि त्यांची अन्नसुरक्षा अबाधित राहील. या निर्णयामुळे लाखो गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
वितरणाची सुलभता आणि सूचना
शासनाने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य तातडीने आणि सुलभरित्या वितरित करण्याच्या सूचना क्षेत्रीय यंत्रणेला दिल्या आहेत. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत, जेणेकरून लाभार्थ्यांना धान्य (Grain Supply) मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
पुरवठा विभागाने सर्व रास्त भाव दुकानदारांना पुरेसा धान्यसाठा उपलब्ध करून देण्याचे आणि वितरणाची प्रक्रिया ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. लाभार्थ्यांनी देखील ऑगस्ट २०२५ पर्यंतचे आपले धान्य ३० जून २०२५ पर्यंत आपल्या संबंधित रास्त भाव दुकानातून त्वरित उचलून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…