संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ निराधार अनुदान योजना काय आहे ? ते ऑनलाईन व ऑफलाईन कसं काढायचं | Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2024

By Chaughule Mahesh

Published on:

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2024

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2024: महाराष्ट्र शासन विविध योजनांद्वारे निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला इत्यादींना आर्थिक मदत करते. या योजनांमध्ये काही योजना राज्य सरकारने आणि काही केंद्र सरकारने तर काही योजना राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे राबविल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पात्रता :

  • निराधार व्यक्ती,
  • अंध,
  • अपंग,
  • अनाथ मुले,
  • मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती,
  • घटस्फोटित
  • महिला, परित्यक्ता महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, अत्याचारी स्त्रिया, ट्रान्सजेंडर इत्यादींना आर्थिक मदत देणे.

लाभार्थी :

या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्याअत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे

संजय गांधी निराधार योजनेत फायदे:

या योजनेखाली पात्र होणा-या

● कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 1000/- प्रतिमहा
● एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 1500/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.

संजय गांधी निराधार योजनेत ऑनलाईन साठीचे कागदपत्रे:-

  • ओळख पुरावा
  • अर्जदाराचा फोटो
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • तलाठी अहवाल

पत्त्याचा पुरावा

  • शिधापत्रिका, वीजबिल
  • ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखला ही ग्राह्य धरण्यात येईल.

वयाचा पुरावा

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र
  • ग्रामीण/नागरी खणालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैदयकिय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला

उत्पन्नाचा पुरावा

तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा सांक्षाकित उतारा

रहिवाशी दाखला

ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला.

इतर दस्तऐवज

  • अर्जदार महिलेच्या पतीस शिक्षा झाल्याबद्दल मा. न्यायालयाच्या आदेशाची प्रत
  • घटस्फोटीत महिलेसंदर्भात पोटगी न मिळणाऱ्या महिला घटस्फोटासाठी न्यायालयीन आदेश.
  • पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिकेच्या मृत्यु नोंदवहीतील उतारा.
  • तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका / महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र.
  • या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणारी महिला -घटस्फोटासाठी न्यायालयीन आदेश आणि पतीने द्यावयाच्या देखभाल रकमेचा पुरावा.
  • शारीरिक छळ झालेल्या / बलात्कार झालेल्या अत्याचारित महिलेच्या बाबतीत जिल्हा शल्यचिकित्सक (सिविल सर्जन) व महिला व बाल विकास अधिकान्यांचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हयाची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र.
  • घटस्फोटित मुस्लीम महिलेसंदर्भात तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जीदमधील काझीने त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसीलदारासमोर शपथपत्र अथवा गावामध्ये / शहरामध्ये मुस्लीम समाजासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी जी नोंदणीकृत संस्था असेल. त्या संस्थेने ठराव करून दिल्यास प्रमाणपत्र

संजय गांधी निराधार योजनेत ऑनलाईनसाठी लिंक –

  • संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.
  • https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
  • अर्ज करून झाल्यानंतर विचारलेल्या कागदपत्रांचे PDF अपलोड करून अर्ज सादर / सबमिट करायचा आहे.
  • अर्ज करताना ३३ /- रुपयांचे payment करायचे आहे.
  • payment झाल्यावर अर्ज ३० दिवसांसाठी मजुरीसाठी तहसील कार्यालय मध्ये जाईल.
  • ३० दिवसानंतर सुद्धा अर्ज मंजूर झाला नाही तर तुमचे सर्व कागदपत्रे सहित तहसील कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रे जमा करायची आहे , मग अर्ज मंजूर करायचा आहे.

Leave a Comment