शिलाई मशिन योजनेसाठी अर्ज सुरू | Shilai Machin Yojana 2025

By Chaughule Mahesh

Updated on:

Shilai Machin Yojana 2025: पंतप्रधान विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत सरकार देशभरातील सुमारे 50,000 पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शिलाई मशीनच नव्हे तर त्यासोबत शिलाई मशीन चालवण्याचे मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्याचबरोबर या महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे.या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अशा महिलांना स्वावलंबी बनवणे ज्यांना घराबाहेर पडून काम करणे शक्य नाही किंवा ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत.

या योजनेमुळे त्या घरातूनच कपडे शिवून चांगले उत्पन्न मिळवू शकतील. सरकारने या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षणाच्या काळात 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य आणि 500 रुपयांची विशेष आर्थिक मदत देण्याचीही तरतूद केली आहे.

फ्री शिलाई मशीन योजनाचे उद्दिष्ट

  • देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना फ्री शिलाई मशीन वाटप करून त्यांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • महिलांना आत्मनिर्भवण बनवण्यासाठी सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात आहे. यातून महिला आपल्या पायावर उभा राहून कुटुंबाची सक्षम पणे जबाबदारी पेलु शकतील.
  • गरीब महिलांचे जीवनमान सुधारणे.या योजनेच्या माध्यमातून रोजगार देऊन महिलांचे उत्पन्न वाढवणे महिलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
  • आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तिला आत्मनिर्भर करणे.
  • शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तिला खाजगी किंवा बँकेतून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये यासाठी ही योजना काम करत आहे.
  • महिलांचा आर्थिक विकास करणे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

फ्री शिलाई मशीन योजनेचे फायदे

  1. देशभरातील प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन देण्यात येत असल्यामुळे या महिलांना कुठल्याही प्रकारचे कर्ज घेण्याची आवश्यकता भासत नाही आणि त्या सहज आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
  2. शिवणकामाच्या माध्यमातून महिलाना रोजगार मिळतो.यातून महिला आत्मनिर्भर बनवून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खंबीरपणे पेलु शकतात.
  3. महिलेचा आर्थिक विकास होण्यासही हातभार लागतो.देशाच्या आत्मनिर्भर भारत या योजनेला फ्री शिलाई मशीन योजनेतून वाटचालीला चालना मिळते.
  4. शिवणकाम करून महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास या योजनेचा मोठा हातभार लागतो.
  5. महिला सशक्तिकरणाला यातून बळ मिळते.
  6. महिलांच्या कला कौशल्यात यातून भर पडते तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
  7. महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्या स्वावलंबी बनतात.

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र साठी आवश्यक कागदपत्रे

Document of Shilai Machine Yojana 2025

  1. अर्जदार महिलेकडे आधार कार्ड असावे.
  2. उत्पन्नाचा दाखला काढलेला असावा. (वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारापर्यंत असावे.)
  3. जन्म दाखला( शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे)
  4. महिलेचा पासपोर्ट फोटो
  5. मोबाईल क्रमांक
  6. महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  7. महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
  8. रहिवासी प्रमाणपत्र असावे
  9. रेशन कार्ड
  10. जातीचे प्रमाणपत्र
  11. शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

शिळी मशीन योजना अर्ज प्रक्रिया

Shilai Machin Yojana Application या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • स्थानिक उद्योग केंद्रातून अर्ज फॉर्म मिळवावा.
  • अर्जात सर्व आवश्यक माहिती भरावी.
  • आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • भरलेला अर्ज आणि कागदपत्रे एका लिफाफ्यात ठेवून त्यावर नाव व पत्ता लिहावा.
  • अर्ज उद्योग केंद्रात जमा करावा.
  • अर्ज मंजूर झाल्यानंतर शिलाई मशीन वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहावे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment