Shravanbal Yojana 2025: अशी योजना जी देते जेष्ठ नागरिकांना 1500 रूपये निवृत्तिवेतन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडून श्रावण बाळ सेवा निवृत्तीची योजना राबवण्यात आली ज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सराकारच्या सामाजिक न्याय विभागकडून अनेक योजना (Maharashtra Government Yojana) राबवण्यात येतात. त्या माध्यमातून राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निवृत्तीवेतन (Senior Citizens Pension Schemes) देण्यात येते. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही त्यापैकीच एक योजना असून त्या माध्यमातून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन देण्यात येतं.
श्रावण बाळ योजना म्हणजे काय
कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या वृद्धपकाळात औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसतो. त्यांच्या घरातील वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष होते वृद्धपकाळात वृद्ध व्यक्तींकडे कमाईचे साधन नसते, त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यांच्या मुलावर मुलीवर सुनेवर किंवा घरातील एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती हलकीसची असल्यामुळे त्यांना औषध उपचाराचा खर्च आवाक्याचा असतो त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना समाजात जगणे कठीण होते. त्यांच्याकडे कुठलीही आर्थिक पाठबळ नसते. अशाच वयोवृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी म्हणजेच 65 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या या कुटुंबातील व्यक्तीसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे.
श्रावण बाळ योजनेचा उद्देश
श्रावण बाळ ही योजना राज्यातील 65 वर्षांवरील गरीब आणि वंचित ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹1500 निवृत्तीवेतन प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळवून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे, त्याचे जीवनमान सुधारणे आणि जेष्ठ नागरिकांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. Shravan bal yojana documents in marathi
श्रावण बाळ योजना कोणासाठी आहे
श्रावण बाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना sharvan bal yojna अंतर्गत वय वर्ष 65 वर्ष व 65 वर्षावरील गरजू, गरीब, आर्थिक दृष्टा कमजोर, निराधार वृद्ध लाभयार्थ्याना महाराष्ट्र राज्य शासना तर्फे प्रतिमहा 1500 रुपये बँक खात्यावर वितरित केले जातात.
श्रावणबाळ योजना पात्रता निकष
- 1) वय: किमान 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक
- 2) राहिवास: किमान 15 वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
- 3) वार्षिक उत्पन्न: ₹21,000 पेक्षा कमी असावे
- 4) दारिद्यरेषेखालील आणि त्यावरील नागरिकही अर्ज करू शकतात
श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेचे फायदे
- वृद्ध लोकांना आर्थिक सहाय्य्य मिळेल
- वृद्ध लोकांचे जीवन सुधारून , त्यांना कोणावर अवलंबुन राहण्याची आवश्यकता नसणार
- श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेमुळे वृद्ध नागरिक आत्मनिर्भर होतील
- वृद्ध लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल
- Shravan Bal Yojana Maharashtra योजनेअंर्तगत लाभार्थीना राज्य सरकार कडून दर महिन्याला १५०० /- रु , असे आर्थिक सहाय्य्य देण्यात येते ह्यामुळे वृद्ध नागरिक आपल्या नेहमीच्या गरजा पूर्ण करू शकतील
श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना नियम :
- अर्जदार हा किंवा ह्यांच्या कुटुंबातील कोणती सदस्य सरकारी शाखेत कामास असल्यास त्यांना अर्ज भरता येऊ शकत नाही.
- अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थायिक असावा , महाराष्ट्राबाहेर स्थायिक असणाऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा , भारताबाहेर चा रहिवासी नसावा.
- अर्जदार / लाभार्थी ह्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २१००० / – पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव हे दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असावे.
- लाभार्थीकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असावे [ BPL ].
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- 1) अर्जाचा विहीत नमुना
- 2) वयाचा दाखला (जन्म प्रमाणपत्र / आधार कार्ड / पॅन कार्ड)
- 3) रहिवासी दाखला
- 4) आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र
- 5) बैंक पासबुक झेरॉक्स
- 6) अर्जदाराचा फोटो
- 6) उत्पन्न प्रमाणपत्र
श्रावण बाळ योजना फॉर्म pdf | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत :
या योजनेची माहिती तुम्हाला ह्या लेखात मिळाली असेल , आणखी सखोल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये किंवा तलाठी कार्यालय मध्ये जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता तिथं जाऊन तुम्ही अर्ज भरून , आवश्यक असणारे सगळे कागदपत्रे जोडून अर्ज त्या कार्यालय मध्ये सादर करू शकता
अर्ज सादर करून झाल्यानंतर , कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून पोचपावती अवश्य घ्या.
अर्जदार तहसलिदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत :
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम आपण https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Registration/Register
- या संकेतस्थळावर जा.येथे आपणास नवीन यूजर नोंदणी पर्यायांचा वापर करा.
- आपली नोंदणी पूर्ण करून आपण एक यूजर आयडी व पासवर्ड तयार करता येईल.
- आपला आयडी व पासवर्ड टाकून आपण लॉगिन करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर आपल्या समोर एक शोधा असा टॅब दिसेल त्या मध्ये आपण श्रावण बाळ असे नाव शोधा.
- आपल्या समोर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असा पर्याय दिसेल.
- त्या मध्ये आपणास संजय गांधी निराधार योजना / श्रावण बाळ योजने अंतर्गत प्राप्त अर्जदार निर्णय घेणे असा पर्याय दिसेल.
- आपण संजय गांधी निराधार योजना / श्रावण बाळ योजने अंतर्गत प्राप्त अर्जदार निर्णय घेणे या पर्यायावर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी
- शेवटी आपला अर्ज सबमीट करावा.