Sukanya Samriddhi Yojana 2025 SSY: सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र शासनाने योजना मुलींसाठी राबवलेली आहे. या योजनेमध्ये तुम्ही मुलींसाठी बचत करू शकता, जी तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलींच्या भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारने योजना राबवलेली आहे.
Table of Contents
सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता
- केवळ 10 वर्ष पेक्षा कमी वय असलेल्या मुलीच या योजनेसाठी पात्र मानल्या जातील.
- या योजनेअंतर्गत ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणाऱ्या मुलीच या योजनेच्या लाभार्थी ठरतील.
- एका कुटुंबातील दोन मुलीच्या नावे बचत खाते उघडता येऊ शकते.
- सर्व पालकांना निर्धारित निश्चित केलेल्या वेळेवर प्रीमियम रक्कम त्या खात्यामध्ये जमा करावी लागेल.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
Sukanya Samriddhi Yojana SSY ही एक सरकारी सेविंग स्कीम आहे. केंद्र सरकारद्वारे मुलींचे भविष्य उज्ज्वल बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.ही एक सरकारी योजना असल्याने यात आर्थिक नुकसानाची भिती नाही. म्हणजे गॅरंटीने तुमचे पैसे परत मिळतात.
सुकन्या समृद्धि योजना ही दिर्घ काळासाठी सुरू केलेली छोटी बचत योजना आहे. यात वार्षिक कंपाउंडिंगचा लाभ मिळतो. म्हणजे गुंतवणूकीवरही चांगला परतावा मिळतो. विशेष म्हणजे दत्तक घेतलेल्या मुलींचाही यात समावेश करण्यात आलेला आहे.कुटुंबातील केवळ दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.
सुकन्या समृद्धि योजना अंतर्गत गुंतवणूकदार आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक करू शकतात. यात एका आर्थिक वर्षात कमीत कमी २५० रूपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रूपयांची गुंतवणूक केली जावू शकते.मुलीचे वय १८ वर्ष झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण केल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढली जाऊ शकते. मात्र एका वर्षात तुम्ही केवळ एकाच खात्यातून रक्कम काढू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी
सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलीच्या नावावर बचत खाते उघडल्यानंतर सतत 15 वर्ष ठराविक प्रीमियम रक्कम भरावी लागेल. जेव्हा तुम्ही निश्चित केलेल्या वर्षापर्यंत प्रीमियम रक्कम भरणे पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या बँकेद्वारे तुम्हाला व्याज मिळत राहील. या योजनेच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये केवळ 15 वर्षापर्यंतच तुम्ही रक्कम जमा करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठीची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पालकाचे पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
सुकन्या समृद्धी योजनेतील जमा रक्कम काढण्याचा नियम
Sukanya Samriddhi Yojana योजना परिपक्व होणे म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या 21 वर्षानंतर किंवा मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर रक्कम काढता येते. किंवा मुलगी 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. आपण ही रक्कम एकदाच किंवा टप्प्याटप्प्यानेही काढू शकतो. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जी शिल्लक रक्कम राहते त्यातील 50 टक्के रक्कम तुम्हाला काढता येते.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कसे उघडावे?
- जर तुम्हालाही आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बचत खाते उघडायचे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- सर्वात प्रथम तुम्हाला बचत खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या बँक मध्ये जावे लागेल.
- बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेसाठीचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज मिळाल्यानंतर त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा.
- त्यानंतर त्यासोबत द्यावयाची सर्व कागदपत्रे त्या फॉर्म सोबत जोडा.
- त्यानंतर पुन्हा एकदा अर्ज तपासून पहा.अर्ज तपासून झाल्यानंतर तुम्ही हा अर्ज पुन्हा बँकेमध्ये जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला 250 रुपयांपासून 1.5 लाख रुपये पर्यंत एक रकमी रक्कम जमा करायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल ती पावती तुम्ही तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
- अशा सोप्या पद्धतीने तुम्ही सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.
हेही वाचा – या योजनेअंतर्गत महिलांना मिळतात ५ लाख रुपये; तर आजच करा अर्ज | lakhpati didi yojana Maharashtra
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते या बँकेत उघडा
Some of Sukanya Samriddhi Yojana account opening सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे पोस्ट ऑफिस मध्ये उघडू शकता किंवा सरकारी बँकेत देखील ही खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी ज्या सरकारी बँकेत खाते उघडता येतील आशा काही बँकेची यादी खाली देत आहोत.
- पोस्ट ऑफिस (post office)
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- बँक ऑफ बडोदा (bank of baroda)
- पंजाब नॅशनल बँक (PNB)
- बँक ऑफ इंडिया (bank of india)
- युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
तुम्ही आरबीआय RBI ची वेबसाइट अथवा अन्य काही संस्थांच्या साईट वरूनही सुकन्या समृद्धी योजने Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत खाते उघडण्याचा अर्ज डाउनलोड करू शकता. भारतीय रीझर्व बँक, पोस्ट, एसबीआय, पिएनबी, axis बँक, आयसीआयसीआय बँक आदि बँकेच्या अधिकृत साईट वरूनही तुम्ही या योजनेचा अर्ज डाउनलोड करू शकता.
हेही वाचा – महिलांना मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या | Mahila Udyogini loan Yojana
कधी बंद करता येते
- सुकन्या समृद्धी योजनेचे खातेसुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana SSY 15 वर्ष गुंतवणूक करणे आवश्यक आहे मात्र काही परिस्थितीत वेळेपूर्वी खाते बंद करता येते.
- सुकन्या समृद्धी योजनेच्या Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत ज्या मुलीच्या नावे खाते सुरू केले आहे त्या मुलीचा मृत्यू झाल्यास असे खाते बंद केले जाते.
- पालकाचा मृत्यू झाल्यासही खाते बंद करता येते.
- मुलीला एखादा गंभीर आजार झाल्यावरही असे खाते बंद करता येते.
- विदेशात गेलेल्या मुलीचेही खाते बंद करण्यात येते. आर्थिक दृष्ट्या पालक सक्षम नसल्यासही खाते बंद करता येते.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….बांधकाम कामगारांना या सर्व प्रकारच्या योजनांच्या लाभ घेता येतो. या पुढेही या सर्व योजनांची माहिती आपल्या वेबसाईट वरती येत राहतील….
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा