तुम्ही UPI वापरत आहे; तर हा बदल नक्कीच जाणून घ्या | UPI new updates on February

By Chaughule Mahesh

Updated on:

UPI new updates on February 2025: आजपासून UPI डिस्प्युट रिझॉल्यूशन सिस्टिममध्ये (URCS) स्वयंचलित स्वीकृती किंवा नकार लागू होईल. त रिटर्नवर आधारित ट्रान्झॅक्शन क्रेडिट कन्फर्मेशन (TCC) आणि चार्जबॅकची स्वयंचलित स्वीकृती किंवा नकार देण्यात आला आहे. याविषयी जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गेल्या काही वर्षांत युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI वापरण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. आजकाल लोक UPI चा वापर करून 5 ते लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करतात. UPI सुविधा सुरू झाल्यापासून लोक कमी रोकड ठेवतात आणि याद्वारे काही सेकंदात पेमेंट केले जाते. UPI new update today

UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवते. भारता व्यतिरिक्त श्रीलंका, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, भूतान, जपान, फिलिपाईन्स, इथिओपिया आणि न्यूझीलंडमध्येही UPI चा वापर सुरू झाला आहे. यामुळे भारतीय लोकांना तेथे व्यवहार करणे सोपे झाले आहे.

‘हा’ नवा नियम लागू होणारदरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात ट्रान्झॅक्शन क्रेडिट कन्फर्मेशन (TCC) आणि रिटर्नवर आधारित चार्जबॅक स्वयंचलितपणे स्वीकारणे किंवा नाकारणे अधोरेखित केले आहे.

UPI चार्जबॅक सिस्टिम म्हणजे काय?

NPCI ने आणलेले नवे धोरण म्हणजे वाद, फसवणूक किंवा तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण झालेला UPI व्यवहार UPI चार्जबॅकद्वारे परत करणे. ही प्रक्रिया करदात्याच्या बँकेकडून सुरू केली जाईल आणि जर बँकेला ते योग्य वाटले तर पेमेंट युजर्सच्या खात्यात परत केले जाईल.

चार्जबॅक सिस्टीमची फीचर्स

UPI डिस्प्युट रिझॉल्यूशन सिस्टिममध्ये (URCS) स्वयंचलित स्वीकृती किंवा नकार 15 फेब्रुवारीपासून लागू होईल. नवीन नियम फक्त बल्क अपलोड पर्याय आणि युनिफाइड डिस्प्यूट रिझॉल्यूशन इंटरफेस (UDIR) ला लागू होतो, फ्रंट-एंड डिस्प्यूट रिझॉल्यूशनसाठी नाही. लाभार्थी बँकांना चार्जबॅक अंतिम होण्यापूर्वी व्यवहार सोडविण्यासाठी वेळ असेल.

चार्जबॅक आणि परतावा यात काय फरक?

जेव्हा एखादा युजर्स UPI पेमेंट पोर्टल किंवा कोणत्याही सेवा देणाऱ्या कंपनीकडे विनंती करतो, तेव्हा प्रकरणाची तपासणी केल्यानंतर परताव्याची प्रक्रिया केली जाते. परंतु UPI चार्जबॅकमध्ये कोणताही चुकीचा व्यवहार झाल्यानंतर युजर्सला पेटीएम, गुगल पे, फोनपे सारख्या यूपीआय ट्रान्झॅक्शन अ‍ॅप्सवर रिपोर्ट करण्याऐवजी त्यांच्या बँकेशी संपर्क साधावा लागतो. यानंतर बँक तुमच्या प्रकरणाची चौकशी करून त्यावर चार्जबॅक कारवाई करेल.

NPCI ने बँकांना दिले निर्देश

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय सेवा पुरवठादार आणि युपीआय अ‍ॅप्सनी व्यापाऱ्यांची एमसीसी ९३११ कॅटेगरीतील देवाण-घेवाण मर्यादा वाढवण्यात येईल, याची खात्री करून घ्यावी. १५ सप्टेंबरपासून हे लागू करण्यास सांगण्यात आले आहे म्हणजे १६ सप्टेंबरपासून ५ लाखांपर्यंतचे व्यवहार कर भरणा करणाऱ्यांना करता येणार आहेत.

याचा बँकांवर होणार परिणाम

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सर्व युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सदस्य बँकांशी संबंधित अधिकाऱ्यांना या अपडेटबद्दल माहिती देण्यास सांगितलंय. नवीन नियमांमुळे वाद व्यवस्थापन सुरळीत होईल, दंड कमी करणं आणि सेटलमेंट सुधारेल अशी अपेक्षा आहे.(UPI updates on Marathi)

हेही वाचा –

• शेतकऱ्यांना मिळतं आहे मोफत पाईपलाइन

• सातबारा उताऱ्यात 11 नवे बदल; महसूल विभागाचा मोठा निर्णय

• शेतकऱ्यांना मिळणार मोफत कृषी सोलार पंप, मुख्यमंत्र्याची घोषणा

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment