PM Vidyalakshmi Yojana 2025: महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही PM Vidyalakshmi Scheme 2025 सुरू केलेली आहे. विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाचा खर्च या योजनेमार्फत केला जातो. ही योजना प्रत्येक नॅशनल बँक मध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला या आर्टिकलचा उपयोग नक्कीच होईल.
पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना कोणासाठी?
पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना देशातील ८६० उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये (QHEI) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज प्रदान करते. ही योजना अधिक प्रभावी करण्यासाठी सरकारने ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर ७५% क्रेडिट हमी देखील दिली आहे. यामुळे बँकांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना कर्ज देण्यास प्रोत्साहन मिळेल. याव्यतिरिक्त, कमकुवत उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत आंशिक किंवा पूर्ण व्याज अनुदान देण्याची तरतूद आहे.
हेही वाचा – ही योजना करेल मुलींचे भविष्य उज्वल; Sukanya Samriddhi Yojana 2025
विनातारण कर्ज
पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तारणमुक्त कर्ज मिळेल. तसेच, यासाठी कोणत्याही हमीदाराची आवश्यकता राहणार नाही. या योजनेअंतर्गत, अर्जांची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात आणि कर्ज मंजूर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचे फायदे सामान्य विद्यार्थ्यांना देण्यासाठी, बँक ऑफ बडोदा (BoB) ने १२ शैक्षणिक कर्ज मंजुरी कक्ष (ELSC) आणि ११९ रिटेल मालमत्ता प्रक्रिया कक्ष (RAPC) देखील तयार केले आहेत. याशिवाय, बँकेच्या ८,३०० हून अधिक शाखांमधूनही योजनेचा लाभ घेता येईल. पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेचा उद्देश उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या परंतु आर्थिक अडचणींमुळे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे आहे.
हेही वाचा – लेक लाडकी योजनेचा निधी वितरण सुरू; जिआर आणि अर्ज प्रक्रिया | Lek Ladaki Yojana Updates
विद्यालक्ष्मी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
1. ओळखपत्र (Identity Proof):
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
2. निवास प्रमाणपत्र (Address Proof):
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- विज बिल,
- पाणी बिल,
- गॅस कनेक्शन बिल
- रहिवासाचा पुरावा देणारा शासकीय कागद
3. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (Educational Qualification Certificates):
- दहावी व बारावीचे गुणपत्रक
- संबंधित शिक्षण संस्थेत प्रवेशासाठीचे प्रवेश पत्र किंवा प्रवेशाची पावती
- उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या अभ्यासक्रमाचे प्रवेशपत्र
4. आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate):
- पालकांचे किंवा अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
- आयटीआर (आयकर रिटर्न) किंवा उत्पन्नाचा स्त्रोत दाखवणारे कागदपत्र
- BPL प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
5. पासपोर्ट आकाराचे फोटो:
- अर्जदाराचे नवीनतम पासपोर्ट साईज फोटो (२-३ फोटो लागू शकतात)
6. बँक खाते संबंधित कागदपत्रे (Bank Account Documents):
- बँक पासबुकची प्रत (IFSC कोडसह खाते क्रमांक)बँकेचे स्टेटमेंट (गेल्या ६ महिन्यांचे)
7. लोनचा वापर सिद्ध करणारे कागदपत्रे (Loan Utilization Documents):
- शिक्षण शुल्काची पावती किंवा शिकवणी शुल्काची पावती
- वसतिगृह शुल्काची पावती किंवा घरभाड्याची पावती
- अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची पावती.
8. संपूर्ण अर्जाचे पूर्ण केलेले फॉर्म (Completed Application Form):
- विद्यालक्ष्मी पोर्टलवरून डाउनलोड केलेला आणि भरलेला अर्ज
हेही वाचा – बांधकाम कामगारांच्या मुलांना ऍडमिशन साठी मिळणार २० हजार रुपये | Bandhkam Kamgar childrens Scholarship Scheme
विद्यालक्ष्मी योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया
- PM Vidya Lakshmi Yojana How to Apply : उच्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. त्याचे नाव पीएम विद्यालक्षमी असे आहे.
- https://www.vidyalakshmi.co.i n/Students/ या पोर्टलवर विद्यार्थी शिक्षण कर्ज आणि व्याजदराच्या अनुदानासाठी अर्ज करु शकतात.
- PM Vidyalakshmi Scheme 2024 : अर्ज प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी आणि सर्व बँकांसाठी हे पोर्टल योग्य असणार आहे. वेळात सबसिडी इ-वाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी वॉलेटच्या माध्यमातून मिळेल.
- सर्वात प्रथम अर्जदाराला विद्यालक्ष्मी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि लॉगिन होईल. कॉमन एज्युकेशन लोन एप्लीकेशन फॉर्म हा अर्ज काळजीपूर्वक भरून अचूक माहिती यावर द्यावी.
- अर्ज भरून झाल्यानंतर अर्जदाराने आपली लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक पात्रता आणि सुविधानुसार, शैक्षणिक कर्ज सर्च करण्यासाठी अप्लाय या बटनावर क्लिक करावे.
हेही वाचा – तुम्हाला टायपिंग येतेय का? ६५०० रुपये मिळणार महाराष्ट्र सरकार तर्फे | Amrut Yojna Maharashtra
विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून मिळणारे कर्ज
- 7.5लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर विद्यार्थ्यांना थकबाकी रकमेवर 75 टक्के क्रेडिट गॅरंटी मिळणार आहे. यामुळे बँकांना या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज देण्यामध्ये मदत होईल.
- Vidya Lakshmi Yojana 2025: या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपये पर्यंत आहे आणि जो सरकारच्या अन्य शिष्यवृत्ती किंवा व्याज अनुदान योजनेचा लाभ घेत नाही त्याला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज स्थगिती कालावधी दरम्यान तीन टक्के व्याजावर सबसिडी देण्यात येईल.
- हे व्याज अनुदान प्रत्येक वर्षी । लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी संस्थातील विद्यार्थी आणि तंत्रज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
- वर्ष 2025-26 ते 2030-31 पर्यंत साठी 36 हजार कोटी रुपये निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. यादरम्यान 7 लाख नवीन विद्यार्थ्यांना व्याज अनुदानाचा लाभमिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्यात येणार आहे; महाराष्ट्र सरकारची नवीन योजना | Mahajyoti Free Tablets Yojana
विद्यालक्ष्मी योजनेमध्ये कॉलेजचा समावेश
Vidya Lakshmi Yojana 2025 in Marathi : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी कोण कोण अर्ज करु शकतो, ही योजना देशातील उच्च शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांची रँकिंग एनआयआरएफ मध्ये चांगली आहे.
यामध्ये ते सर्व सरकारीआणि खाजगी एनआयएसचा समावेश आहे, ज्यांची रँकिंग एनआयआरएफ मध्ये टॉप 100 मध्ये आहे. त्यांची रँकिंग किंवा कुठल्याही विशेष विषयात असो किंवा कुठल्याही विशेष क्षेत्रात असो. केंद्र सरकार द्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व संस्थांना या योजनेमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
सुरुवातीला 860 योग्यसंस्थांना पीएम विद्यालक्ष्मीमी योजनेमध्ये सहभागी करण्यात येणार आहे. या मध्ये 22 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक वर्षी एनआयआरएफच्या नवीन रँकिंगच्या आधारावर ही यादी अपडेट करण्यात येणार आहे.
PM Vidyalaxmi Scheme 2025: प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आयटी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जासाठी एक खिडकी इलेक्ट्रॉनिक मंच उपलब्ध करुन देणार आहे.
विद्यालक्ष्मी शिक्षण कर्ज पाहिजे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करुन या योजनेचा लाभ घेऊ शकता.